Top Stock Picks 2026 : शेअर बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर, दिग्गज ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांसाठी ५ दर्जेदार शेअर्सची निवड केली आहे. उत्तम तिमाही निकाल, वाढती मागणी आणि व्यवसायाचा विस्तार पाहता टाटा स्टील, एल अँड टी आणि बीईएल यांसारख्या शेअर्समध्ये येत्या काळात मोठी तेजी अपेक्षित आहे.
१. टाटा स्टील : युरोपमधील सुधारणेचा फायदाटार्गेट प्राईस : २२० रुपयेदेशांतर्गत स्टीलची वाढती मागणी आणि युरोपमधील व्यवसायातील सुधारणा यामुळे टाटा स्टील 'मजबूत' स्थितीत आहे. ब्रिटनमधील ऑपरेशन्स २०२६ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत नफ्यात येण्याची शक्यता आहे. ऑटोमोटिव्ह ग्रेड स्टीलच्या उत्पादनामुळे नफ्याचा टक्का वाढेल.
२. लार्सन अँड टुब्रो (L&T) : पायाभूत सुविधांचा विस्तारटार्गेट प्राईस : ४,६०० रुपयेएल अँड टी कडे सध्या ५.९ लाख कोटी रुपयांची प्रचंड 'ऑर्डर बुक' आहे. हायड्रोकार्बन, रिन्युएबल एनर्जी आणि डेटा सेंटर्समधील संधी पाहता कंपनीच्या महसुलात २२% वाढीचा अंदाज आहे. अणू ऊर्जा क्षेत्रातील संधींवरही कंपनीचे लक्ष आहे.
३. भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) : संरक्षण क्षेत्रातील 'वर्चस्व'टार्गेट प्राईस : ५२० रुपये७३,००० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हाती असल्याने संरक्षण क्षेत्रातील ही कंपनी तेजीत आहे. आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि नौदलाच्या नव्या ऑर्डर्समुळे कंपनीचा नफा १६% दराने वाढण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर टंचाईचा कोणताही परिणाम कंपनीवर झालेला नाही.
४. डेल्लीवरी (Delhivery) : लॉजिस्टिक क्षेत्रातील 'किंग'टार्गेट प्राईस : ५७० रुपये'इकॉम एक्सप्रेस'च्या संपादनानंतर दिल्लीवरीचा बाजारपेठेतील हिस्सा वाढला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ७.४% एबिटा मार्जिन नोंदवून सर्वांना चकित केले. 'दिल्लीवरी डायरेक्ट' आणि 'रॅपिड' यांसारख्या नव्या सेवांमुळे नफ्यात ५४% वाढ अपेक्षित आहे.
५. होम फर्स्ट फायनान्स : परवडणाऱ्या घरांचे स्वप्नटार्गेट प्राईस : १,३७० रुपयेपरवडणाऱ्या घरांच्या कर्ज क्षेत्रात ही कंपनी आघाडीवर आहे. कंपनीच्या कर्जाचा विस्तार २५% दराने होण्याची शक्यता असून, शाखा विस्ताराचा फायदा नफा वाढवण्यासाठी होईल.
| शेअरचे नाव | सध्याची किंमत (रु.)* | लक्ष्य किंमत (रु.) | वाढीची शक्यता (%) |
| डेल्लीवरी | ४४० | 570 | 30% |
| होमफर्स्ट फायनान्स | १,१३१ | १,३७० | २१% |
| भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) | ४३९ | ५२० | १८% |
| लार्सन अँड टुब्रो (L&T) | ३९२१ | ४६०० | १७% |
| टाटा स्टील | १८८ | २२० | १७% |
मोतीलाल ओसवाल यांच्या मते, या पाचही कंपन्यांचे व्यवसायाचे मॉडेल भक्कम असून आगामी दोन ते तीन वर्षे हे शेअर्स पोर्टफोलिओला मोठी ताकद देऊ शकतात. विशेषतः पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील सरकारी धोरणांचा या कंपन्यांना थेट लाभ मिळत आहे.वाचा - कर्ज स्वस्त होणार की प्रतीक्षा वाढणार? आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे सर्वांचे डोळे
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Motilal Oswal recommends Tata Steel, L&T, BEL, Delhivery, and Home First Finance, citing strong financials and growth potential. Target prices suggest significant upside in these sectors.
Web Summary : मोतीलाल ओसवाल ने टाटा स्टील, एलएंडटी, बीईएल, डेल्हीवरी और होम फर्स्ट फाइनेंस की सिफारिश की है, मजबूत वित्तीय और विकास क्षमता का हवाला दिया है। लक्ष्य मूल्य इन क्षेत्रों में महत्वपूर्ण वृद्धि का सुझाव देते हैं।